बुलढाणा – अभिमान शिरसाट
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सध्या धामधूम सुरू असून गावखेड्यात भावी सरपंच कोण ? अशा चर्चेला उधाण आले आहे. गावातील चौकाचौकात कट्ट्यावर बसून गावकरी मात्र या चर्चेतून चर्चात्मक आनंद घेत आहे.
अशातच चिखली तालुक्यातील अनेक गावातील प्रभाग बिनविरोध झाल्याचे चित्र आहे याच धर्तीवर तालुक्यातील सात सदस्य असलेली मलगी या गावची पाच + दोन सदस्य असलेली ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या समजदार पणाच्या धोरणामुळे बिनविरोध झाली आहे.
गावातील बौद्ध ,अनुसूचित जाती ,जमाती व मराठा ,ओबीसी समाजातील युवा वर्ग तथा बुजुर्ग ग्रामस्थांच्या समन्वयाने गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावातील सामाजिक सलोखा अबाधित राखून सर्व समाजाच्या भावना गावकऱ्यांकडून जपल्यामुळे सर्व गावकऱ्यांचे सुज्ञ नागरिक तथा मतदारांकडून कौतुक होत आहे.