मौदा – उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस जिल्ह्यामंध्ये मनीषा वाल्मिकी नामक १९ वर्षीय तरुण मुलीवर क्रूरतापूर्वक मारपीट करून सामूहिक बलात्कार करणाऱ्या त्या पाच दोषी नराधमांना फाशीची शिक्षा देऊन आरोपींचा बचाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हाथरस जिल्हा कलेक्टर व या प्रकरणासंबंधीत सर्व पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून बरखास्त करण्याची मांगणी.
निवेदनाच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तहसीलदार मौदा प्रशांत सांगडे यांचे मार्फत पाठविलेल्या निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस मंध्ये मनीषा वाल्मिकी नामक १९ वर्षीय तरुणीवर पाच नराधमांनी क्रूरतापूर्वक मारपीट करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली.
काही आरोपींनी बलात्कारानंतर त्या पीडित बहिणीच्या जिभेला आपल्या दाताने चावा घेऊन जीभेला जखमी केले व पीडितेच्या मानेची (गर्दनची) हड्डी मोडली, जेणेकरून पीडित तरुणीने त्या क्रूर पाच नराधमांविरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार आणि तोंडी बयान उत्तरप्रदेश राज्यातील स्थानिक पोलीस प्रशासनासमोर दाखल केलीे नाही पाहिजे.
ही घटना अत्यंत हृदयविकारक असून माणुसकीला काळीमा घालत सहन न करण्यापलीकडची आहे.

असे मत सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.काल दिनांक २९/०९/२०२० ला अखेर ती पीडित तरुणीे अत्यंत वेदनादायक पीडा सहन करून १६ दिवसानंतर संघर्षाची लढाई हरली व दिल्ली येथील शासकीय रुग्णालयात अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला.
हे प्रकरण इतक्यातच संपत नसून पीडित तरुणीने जगाचा निरोप घेतल्यानंतर उत्तरप्रदेशातील स्थानिक हाथरस जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने पीडित तरुणीच्या कुटुंबाला योग्यरीत्या न्याय मिळवुन न देता उलट त्या पाच आरोपी नराधमांना वाचवण्यासाठी प्रयत्नात असल्याचे त्यांच्या वर्तवणुकीवरून दिसून येत आहे.
कारण सदर पीडितेच्या पार्थिव शरीराचे शवविच्छेदन केल्यानंतर पीडित तरुणीचे पार्थिव शरीर तिच्या कुटुंबातील व्यक्तींना न देता उलट पीडित तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्याच स्वतःच्या घरात कैद करून त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता,
काल मध्यरात्री ३:०० वाजताच्या सुमारास पीडित तरुणीचे स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत पीडित तरुणीच्या पार्थिव शरीरावर असलेले खरे तथ्य लपविण्यासाठी जबरदस्तीने अंतिम संस्कार करण्यात आले. ही बाब अत्यंत निंदणीय आणि अन्यायपूर्वक असून उत्तरप्रदेश मधील स्थानिक हाथरस जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

कारण पीडित तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांना अंतिम संस्काराच्या वेळी त्या पीडित तरुणीचा चेहरा सुद्धा पाहू न देता मध्यरात्री पोलीस प्रशासनामार्फत अंतिम संस्कार करणे हा त्या पिडीत तरुणीच्या कुटुंबावर स्थानिक जिल्हा प्रशासनामार्फत केलेला अन्याय असून या प्रकरणात पीडित तरुणीच्या कुटुंबातील लोकांच्या मानवी अधिकाराचे हनन झाल्याची बाब नाकारता येत नाही असेही मत सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.
CBI चौकशीची केली मांगणी.
निवेदनाच्या माध्यमातून रोशन मेश्राम, अशोक पाटील, मनोज कडू व मनोहर भिवगडे यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना विनंती केली की, आपण या प्रकरणात जातीने लक्ष केंद्रित करावे व सदर हाथरस हत्याकांडाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्याकरिता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत व त्या पाचही क्रूर आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा देऊन पीडित तरुणीच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.
तसेच उत्तरप्रदेश राज्यातील हाथरास मधील स्थानिक जिल्हा कलेक्टर व या प्रकरणासंबंधीत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर त्वरित त्यांना सक्तीने सेवेतून काढण्याची कारवाई करावी जेणेकरून CBI चौकशी निष्पक्षरीत्या करता येईल.
निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात रोशन मेश्राम यांच्यासोबत अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा समन्वयक अशोक पाटील, ग्रामपंचायत नेरला येथील उपसरपंच मनोज कडू, मनोहर भिवगडे, विशाल गजभिये, रोशन बांते, प्रभाकर झोड, राजेश गेडाम, अज्जूभाई पठाण, किशोर मेश्राम, स्नेहदीप वाघमारे, हिमांशू रोडे व इत्यादी नागरिक उपस्थित होते.
१) जिथे आरोपींना भर चौकात रॉकेल ओतून जाळायला हवं होतं. तिथे त्या उलट त्याच बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला त्यांच्याच घरात कोंडून व त्यांची दिशाभूल करून कुटुंबातील सदस्यांच्या गैरउपस्थितीत पोलिसांद्वारे मध्यरात्री जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. थुकतो मी या अशा निर्लज्ज व्यवस्थेवर.
– रोशन मेश्राम, सदस्य ग्रामपंचायत नेरला