आजपर्यंत ग्रामपंचायत निवडणूकीत अपराजित असलेले ७३ वर्षीय आजोबांची विरोधकांना धास्ती…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ – चारदा सरपंच, तीनदा उपसरपंच आणि दोनदा ग्राम पंचायत सदस्य अशी ४५ वर्षांची राजकीय कारकिर्द गाजवित वयाच्या त्र्याहत्तरीतही ते ग्राम पंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. विशेष असे की, त्यांनी ग्राम पंचायत निवडणूकीत प्रत्येकवेळी विजय संपादन केला. या निवडणुकीतही त्या अपराजित व्यक्तिमत्वाची विजयाकडेच वाटचाल आहे.

मार्गावरील सावरगड या दोन हजार लोकवस्ती असलेल्या छोट्याशा गावखेड्यातील वास्तव होय. हरिद्वार चंद्रभान खडके रा. सावरगड असे त्या अपराजित व्यक्तीमत्वाचे नाव आहे. घाटंजी मार्गावरील सावरगड या छोट्याशा गावात ९ ऑगस्ट १९४८ ला जन्म झाला. आईवडील मजुरी करायचे, त्यामुळे कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. परिणामी ईयत्ता आठवीपर्यंतच ते शिक्षण घेवू शकले. हरिद्वार खडके यांनी१९७२ मध्ये पहिल्यांदा त्यांना सावरगड ग्राम पंचायतीच्या आखाड्यात उतरविले.

पहिल्या प्रयत्नातच खडके हे विरोधकावर मात करीत मताधिक्याने निवडूण आले. तसेच ते सावरगड ग्राम पंचायतीचे उपसरपंच झाले. त्यानंतर मात्र खडके यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. गावचा विकास साधत सावरगड ग्राम पंचायतीच्या प्रत्येक निवडणुकीत ते निवडूण आले. त्यातूनच त्यांनी १९७२ ते २०२० या कालावधीत तब्बल २० वर्ष सरपंच, १५ वर्ष उपसरपंच आणि दोन  वेळा ग्राम पंचायत सदस्य अशी ४५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून राजनैतिक कारकिर्द गाजविली. 

 सावरगड या दोन हजार ६०० लोकवस्तीच्या गावात अनेक विकासकामे केली. त्यातूनच सावरगड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय रूग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तलाठी कार्यालय, तीन अंगणवाड्या, व्यायाम शाळा, सावरगड हेटी येथे प्राथमिक शाळा,

गावात पाण्याची मुबलक व्यवस्था, क्राँक्रीट रस्ते, नाल्या, समाज मंदिर, शौचालय आणि अनेकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. वयाच्या त्र्याहत्तरीतही तरूणाला लाजवेल असा आत्मविश्वास आणि विकासाचा ध्यास त्यांच्यात पहायला मिळतो हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here