सचिन येवले,यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतीसाठी 16 जानेवारी रोजीला मतदान पार पडले . तर आज सकाळी आठ वाजता पासून सोहळाही तालुक्यातील तहसीलमध्ये तर कुठे पुरवठा विभागाच्या गोडाउन मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजल्यापासून वाजल्यापासून ग्रामपंचायत तिचे निकाल निकाल येणे सुरू झाले . विजयी उमेदवारांच्या कार्यकर्ता कडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.
अनेक ग्रामपंचायत युवा उमेदवार
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या असून स्थानिक विकास आघाडी, पॅनल टाकून निवडणूक लढविण्यात आली . या निवडनूकीत मोठ्या प्रमाणात युवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांना मतदारांनी कौल दिल्याचे दिसून येत आहे.
कुठे नेत्यांना धक्का तर कुठे जल्लोष
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक नेत्यांना पराभूत व्हावे लागले तर कुठे त्यांच्या विजय मिळविला . यवतमाळ तालुक्यातील कीन्ही आणि कापरा या गावात शिवसेनेच्या नेत्यांना धक्का बसला असून शिवसेनेचे माजी सभापती सागरताई पुरी यांना पराभूत व्हावे लागले, तर शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय रंगे याना कापरा गावात त्यांच्या पॅनेलच्या धुव्वा उडवला.
वणी येथे जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या पॅनेलच्या हादरा बसला असून शिवसेनेचे संजय निखाडे यांच्या पॅनेलचे 7 पैकी 6 जागेवर विजय मिळवला. काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या कळंब सावरगाव ग्रामपंचायत वर नऊपैकी सात जागेवर विजय मिळून प्रवीण देशमुख गटाने विजय मिळवला. तर या तालुक्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष मनीषा काटे यांच्या गटाने सहापैकी पाच जागा मिळविल्या.