टाकळी बु परिसरात हरभरा पिकावर अळीसह मर रोगाचा प्रादुर्भाव…

कुशल भगत

शेतकरी संकटात – वातावरणातील बदलाचा परिणाम टाकळी बु गेल्या काही दिवसापासून अचानक वातावरण बदल झाल्याने हरभरा पिकावर अळी व मर रोगाचा पादुर्भाव झाला आहे आधीच कपाशीवरील रोगामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे.

वातावरणातील बदलामुळे रब्बी पिकावर अळ्यणे आक्रमण केले असून त्यामुळे हरभरा पिकावर रोगाचा पादुर्भाव झाला आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे खरीप हंगामातील परतीच्या पावसाने उडीद मूग सोयाबीन तुर कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसातून वाचलेल्या मलाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या परिस्थितीवर मात करीत बळीराजाने रब्बी पिकाची पेरणी केली मात्र निसर्गाच्या अवकृपेने वातावरणात व धुक्यामुळे पिकावर परिणाम दिसून येत आहे त्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा पादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे.

हरभऱ्याची रोगग्रस्त साडे काढून नष्ट करावी अधिक किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कृषी विभागाकडून मार्गदर्शन घेत औषधांची फवारणी करावी कृषी सहाय्यक मिलिंद सदांशिव,
टाकळी बु परिसरातील रब्बी विकावावर अळ्याचा व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कुषी विभागाने शेतकऱ्यांसाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा गावोगावी घेण्याची गरज आहे रामकृष्ण ना वसु शेतकरी टाकळी बु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here