कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाला शासन सर्व प्रकारे सहकार्य करणार…उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत…

रामटेक – राजु कापसे

रामटेक संस्कृत विद्यापीठात दिनांक 15 नोव्हेंबर 2020 ला उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली याप्रसंगी रामटेके आमदार आशीष जयस्वाल कुलसचिव प्रो विजयकुमार, वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर रामचंद्र जोशी विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉक्टर प्रसाद गोखले,

रामटेक परिसर संचालक प्रोफेसर कविता होले, डॉक्टर महेश साळुंखे, सहसंचालक ,,उच्च शिक्षण ,नागपूर ,अधिष्ठाता विभाग ,विभाग प्रमुख ,प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व विशेष त्वाने उपस्थित होते हया वेळी संस्कृत विद्यापीठ वाशी संबंधित प्रश्न मार्गी लावले व त्यांनी सभागृहात पत्रपरिषद संबोधित केले.

सकाळी नऊ वाजता येतात संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीनिवास वरखेडी व अधिकाऱ्याशी चर्चा केली विद्यापीठाच्या प्रलंबित मागण्याचे समाधान केले तसेच मागील तीन वर्षापासून न दिलेल्या कालिदास पुरस्कार पूर्ववत हे शासन देईल असे सांगितले शासनातर्फे 2015 ते 2018 या कालावधीतील प्रलंबित असलेल्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराचे एका महिन्यात वितरण करण्यात येईल,

तसेच 2018 – 19 व 2019 – 20 या वर्षाच्या पुरस्काराची घोषणाही सदर कार्यक्रमात करण्यात येईल महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराची कारवाई यापुढे संस्कृत विश्वविद्यालय कडे सोपविण्यात येईल तसेच त्याचे वितरण नागपूर येथे आयोजित होणाऱ्या महाकवी कालिदास समारोप करण्यात येईल विश्वविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या 1225 विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ओपन गुप्त पद्धतीने होणार असून,

दिनांक 1 ते 13 ऑक्टोबर 2020 दरम्यान अंतिम परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत अंतिम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देताना अडचणी येतील त्यांची त्या जिल्ह्यातील केंद्रावर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता विश्वविद्यालयाने घेतली आहे.

रामटेकच्या नगरपरिषदेने रामटेक मधील कालिदास स्मारक कालिदास विश्वविद्यालय कडे स्वप्नाच्या प्रस्ताव दिल्यास कालिदास स्मारकाची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी आनंदाने आनंदाने मान्यता दिली आहे यासंदर्भातील प्रस्ताव आमदार आशिष जयस्वाल यांनी माननीय मंत्री महोदय समोर मांडला इतर महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली, यावेळी महर्षी पाणिनी संगणक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here