अमरावती : सातत्यान : वकिल गुणरत्न सदावर्ते हे छत्रपतींविषयी वादग्रस्त विधाने करुन मराठा समाजाच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न करतात. सरकारने स्वतः त्यांचा बंदोबस्त करावा, अन्य़था आम्हाला अशा विषवल्लींचा बंदोबस्त करायला वेळ लागणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा चे व ठोक मोर्चा चे राज्यसमन्वयक सुरज बाप्पू देशमुख व अंबादास काचोळे यांनी मद्यमांशी बोलतानि सांगितले.
वकिल गुणरत्न सरोदे जी विधाने करतात, त्यावरुन ते खरोखर वकिल आहेत, की बनावट याची तपासणी करण्याची वेळ आली आहे. सातत्याने गुणवंत सरोदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांसह मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य एका वाहिनीवर केले होते. याच्या निषेधार्थ एक शिष्टमंडळ पोलिस आयुक्तांना निवेदन देणार आहे. तसेच यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केल्या जाईल छत्रपतींविषयी बोलतांना त्यांची जीभ घसरली.
यावेळी सुरज देशमुख म्हणाले, सरोदे हे जाणीवपूर्वक गेली काही वर्षे सातत्याने मराठा समाज, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी व छत्रपतींविषयी वादग्रस्त विधाने करुन चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात. केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हणून हे करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने आजवर कोणीही त्यांना गांभिर्याने घेतले नव्हते.
मात्र काल त्यांनी अक्षरशः कहर केला. मराठी माणुस व सबंध देशाचे आदर्श असलेल्या छत्रपतींविषयी बोलतांना त्यांची जीभ घसरली. त्याबाबत समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहे. यापुढे माध्यमांनी देखील अश व्यक्तीला चर्चेत बोलवावे का, याचा फेरविचार केला पाहिजे.