अहमदपूर – बालाजी तोरणे
अहमदपूर येथील जीपच्या मैदानांवर मराठवाडा मुक्ति दिनाचा शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी तहसीलदार महेश सावंत, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेलार पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे,
अधीक्षक सतीश बिलापट्टे, डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले