दर्यापूर नगर परिषदेची हद्दवाढीस शासनाची मान्यता…

आमदार बळवंत वानखडे यांच्या अथक प्रयत्नांना यश

दर्यापूर :- किरण होले
शहरालगत असलेल्या गायवाडी , जहाणपूर , पेठइतबारपूर , लोधीपूर , गणेशपुर , शिवर , लेहेगाव या गावातील काही भाग लगतच्या ग्रामपंचायत मध्ये आहे. परंतु दर्यापूर शहराला लागून असल्याने आणि ग्रामपंचायतीचा भाग असाल्याने विकासकामांना सदर भागात अंशता प्रमाणात ब्रेक लागला होता. लगतच्या भागातील नागारीकांकडून दर्यापूर नगर परिषदेमध्ये सामावून घे याबाबत बऱ्याच कालावधीपासून मागणी होती. आमदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या प्रयत्नाने अखेर दर्यापूर नगर परिषदेच्या हद्दवाढीस दिनांक 29 जून 2021 रोजी मान्यता मिळाली.

दर्यापूर शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत गायवाडी अंतर्गत साईनगर आणि गणेशपुर या दोन महत्त्वाच्या भागास हद्दवाढीचा फायदा होणार आहे. पावसाळ्यात साईनगरचे होणारे हाल आमदार बळवंत वानखडे यांनी पाहले आहे त्यांना त्यांची जाणीव असताना हद्दवाढीसाठी वारंवार नगरविकास आणि ग्रामविकास विभागाकडे निरंतर सदोदित पाठपुरावा केला.

या हद्दवाढीमुळे मौजा दर्यापूर पूर्वेकडील जहाणपूर ,पेठ इतबारपूर , चांदुर , मौजे बाभळी पश्चिमे कडील लोधीपूर उत्तरेकडील लोधिगाव ,लेहगाव , दर्यापूर उत्तरेकडील पेठ इतबारपूर , दर्यापूर पूर्वेकडील गणेशपूर , दर्यापूर दक्षिणेकडील गणेशपूर साईनगर शिवर या महसुली गावातील बहुतांश सर्वे नंबर चा समावेश हद्दवाढीत झाला असून त्याचा फायदा विकासापासून वंचित राहलेल्या भागास होणार आहे. याबाबत या भागातील नागारीकांकडून आमदार बळवंतभाऊ वानखडे यांचे आभार व कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here