कोरोना बाधितांवर उपचारासाठी शासनमान्य दर पत्रक…

अकोला – महाराष्ट्र शासनाच्या दि. 22 मे 2018 च्या अधिसूचनेनुसार खाजगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पुढील प्रमाणे दर पत्रक बंधनकारक करण्यात आलेले आहे. जनरल वॉर्ड विलगीकरण कक्षकरिता रु. 4000/-, आय सी यु व्हेंटिलेटर शिवाय विलगीकरण कक्षाकरीता रु. 7500/-,

आय सी यु व्हेंटिलेटर विलगीकरण कक्षाकरीता रु. 9000/- याप्रमाणे एका दिवसाचा दर ठरविण्यात आलेला आहे. यात रुग्णांची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, सोनोग्राफी , 2-डी इको, एक्स-रे, ईसीजी तसेच मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर्स तपासणी, रुग्ण तपासणी चार्जेस ,नर्सिंग चार्जेस, जेवण, छोटे उपचार, नाकातून नळी टाकणे, तसेच लघवीसाठी नळी टाकने आदींचा समावेश आहे.

पीपीई किट, सेंटर लाईन टाकने, श्वसन नलिका किंवा अन्ननलिकेत दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया, कोणत्याही अवयवाचा तुकडा तपासणी पाठवणे, छातीतील किंवा पोटातील पाणी काढणे हे दि. 31 डिसेंबर 2019 च्या दर पत्रकाप्रमाणे रुग्णालय आकारू शकतात.

तपासणी शासकीय केंद्रांमध्ये मोफत तर खाजगी प्रयोगशाळेद्वारे केल्यास शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे दर आकारणी करावी लागेल. औषधे, ईमिन्यूग्लोबिन, मेरोपेनम, शिराद्वारे दिली जाणारी पोषक औषधे, टोसिलीझुमॅब इत्यादी दर छापील किंमत प्रमाणे असेल.

सिटीस्कॅन ,एमआरआय तसेच इतर समाविष्ट नसलेले सर्व स्कॅन व प्रयोगशाळा तपासण्यांचे दर आकारणी दि. 30 डिसेंबर 2019 च्या दर पत्रकाप्रमाणे रुग्णालय आकारू शकतात. याचा एका दिवसाच्या दरामध्ये समाविष्ट नाही त्या गोष्टीचा दर रुग्णालय स्वतंत्रपणे आकारू शकतो.

रुग्णालयांनी वरील प्रमाणे दर आकारणी न केल्यास, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यास, बिलाची अवाजवी आकारणी केल्यास व इतर मदतीसाठी वैद्यकीय महाविद्यालय किंवा जिल्हा प्रशासनाची संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here