वरोती गावातली बांधकाम अधिकृत की अनधिकृत की शासनमान्य?

डहाणू – जितेंद्र पाटील

डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणत वाढले आहे. अशा बांधकामांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने वरोती गावामध्ये बेकायदा इमारती, चाळी उभारल्या जात आहे. नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत.

शहरालगत असलेल्या गावामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने ग्रामीण भागाचे शहरीकरण होत आहे. याचा फायदा घेत मोठ्या गावामध्ये अनेक अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात फोफावत आहेत.

दोन -दोन मजली इमारती , मोठ मोठ्या चाळी उभारून त्या भाडे तत्त्वावर देण्याचा गोरख धंदा काही व्यावसायिकांनी उभारला असून यामध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांना बगल देत बांधकामे केली जात असल्याचे चित्र याभागात दिसून येत आहे.

अनधिकृत बांधकामांना प्रशाशनाकडून कोणत्या आधारावर मान्यता दिली जाते ? ग्रामपंचायतीने नोटीस बजावून सुद्धा अनधिकृत कामांचा वेग वाढतच आहे. प्रशासन याबाबत वेळीच लक्ष देईल, की प्रशासन जाऊन बुजून दुर्लक्ष करतेय? वरोती गावातील अनधिकृत बांधकाम लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here