नालासोपाऱ्यात गुंडांचा हैदोस…मित्राच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर तलवारीने हल्ला…घटनेचा video सोशल मिडीयावर व्हायरल…

प्रतिनिधी एच.एस.दसोनी,नालासोपारा

कोरोनाच्या काळात नालासोपारा शहरात गुंडगिरी प्रवृत्तीला उत आल्याचे चित्र दिसून आले आहे. दिवसेंदिवस विविध ठिकाणच्या भागात गुन्हेगारीचे प्रकार घडू लागले आहेत.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.


नालासोपाऱ्यात मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर भररस्त्यात तलवारीने वार करण्यात आले सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर भररस्त्यात तलवारीने वार करण्यात आले आहे. ही घटना 29 जून रोजी नालासोपारा पूर्व येथील प्रगती नगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


गुंडांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. संजय मिश्रा (वय 22) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत 30 जून रोजी 4 गुंडाविरोधात तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर इतर तीन जणांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, नालासोपाऱ्यात हातात तलवारी घेऊन खुलेआम गुंडांचा नंगानाच सुरु आहे.

कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. हातात तलवार, लाठी-काठी घेऊन गुंडांचा हैदोस सुरु असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here