महाराष्ट्र बंदला कुपवाड मध्ये चांगला प्रतिसाद – नगरसेवक विष्णू माने…

सांगली – ज्योती मोरे

शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या,शेतकरी विरोधी धोरणं आणि कायदे राबवून शेतकऱ्यांना जीवनातून उठवायला निघालेल्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने नुकताच महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून कुपवाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

सुरुवातीला सोसायटी चौकातून निषेध फेरी ची सुरवात करण्यात आली.मेंन रोडवरील सोसायटी चौक ते उल्हासनगर बस स्टॉप परत उल्हासनगर बस स्टॉप ते महावीर व्यायाम शाळा तेथून मंगळवार बाजारातून आर.पी पाटील चौक,जिल्हा परिषद शाळा,पाण्याची टाकी ते हनुमान नगर बस स्टॉप जवळून पुन्हा सोसायटी चौकापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली.

यावेळी सोसायटी चौकात लखीमपुर मध्ये मृत्युमुखी झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सत्तेची नशा डोक्यात शिरलेल्या केंद्र सरकारच्या भाजप खासदार व त्याचा सुपुत्र याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

कुपवाड मधील व्यापारी,दुकानदार यांनी आपली दुकाने स्वतःहून बंद ठेवून महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दर्शविला.त्यामुळे शांततेत आंदोलन पार पडले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक विष्णू माने याच्यासह ,पदाधिकारी,व्यापारी,कार्यकर्ते,नागरिक, बंधू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here