Good News | गडचिरोली जिल्हयात आज तिघे कोरोनामुक्त…

दि.२१ जून २०२०

आत्तापर्यंत एकुण ४५ जणांना दवाखान्यातून सुट्टी

सक्रिय कोरोना बाधित १४ राहिले तर एकूण ६० जणांना आत्तापर्यंत कोरोनाची बाधा

गडचिरोली : आज जिल्हयातील आणखी तिघे कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली.

घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये गडचिरोली तालुक्यातील तीघांचा समावेश आहे.

त्यामुळे जिल्हयातील एकुण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ४५ झाली. तर सद्या १४ कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here