Good News | राज्यातील १५ हजार ५१५ रिक्त पदे भरण्यास मंजुरी…उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

न्यूज डेस्क – काल पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्याने पहिल्या दिवशी पुण्यातील स्वप्निल सुनील लोणकर या युवकाने गळफास घेतल्याने हा मुद्दा चांगलाच गाजल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. याप्रकरणी आता सुमारे १५ हजार ५१५ रिक्त पदे भरण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती मिळत आहेत.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून सुमारे १५ हजार ५१५ रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आरक्षणानुसार ही पदे भरली जातील. या निर्णयांवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत, असं पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या घोषणेमुळे एमपीएससी विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे. कोरोना महामारीमुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या जागा भरल्या गेल्या नव्हता. पण, आता या जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यामुळे एका २४ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उडली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वप्निल सुनील लोणकर या तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निल याच्या आत्महत्येने सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या मुद्द्यावर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना MPSCच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here