Good News |मूर्तिजापूर | कोरोना पॉझीटीव्ह असलेले ४ रुग्ण कोरोनामुक्त…


मूर्तिजापूर – दिनांक २७ मी रोजी जुने शहरातील माजी नगरसेवकाच्या तीन नातेवाईकांचा कोरोना पॉझीटीव्ह अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांना उपचारासाठी मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या रुग्णांवर ७ दिवसाच्या उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन आज त्यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातून सुट्टी मिळाली असून त्यांना काही दिवस घरातच क्वारंनटाइन राहावे लागणार आहे.

करोनाबाधित एकूण ऍक्टिव्ह असणारे पेशंट चार पैकी तीन यांना डिस्चार्ज देण्यात आलेला असून आता केवळ एकच ऍक्टिव्ह पेशंट SDH मूर्तिजापूर या ठिकाणी उपचारार्थ आहे….

Also Read: लॉकडाउन शिथिल होताच…उपराजधानीत खूनाचे सत्र सूरु…अवघ्या १६ तासांत चौघांची हत्या…

हिरपूर येथील महिला जीएमसी अकोला येथे उपचारार्थ दाखल होती तिलादेखील चार दिवसापूर्वी डिस्चार्ज देण्यात आलेला आहे……

त्यामुळे आज अखेर मुर्तीजापुर तालुक्यामध्ये केवळ एक ऍक्टिव्ह पेशंट आहे…..

अशी माहिती उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते यांनी सोशल माध्यमातून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here