ब्युटी पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय…पार्लर संचालिकावर गुन्हा दाखल रामनगर पोलिसांची कारवाई…

फोटो- सांकेतिक

राजेशकुमार तायवाडे, गोंदिया

गोंदिया शहरात ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी छापामार कारवाई करून ब्युटी पार्लरच्या महिला संचालिकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई 13 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. विशेष म्हणजे, कारवाईनंतर चार पीडित मुलींना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन करण्यात आले.

शनिवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून गोंदियातही हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या रामनगर परिसरात चालणाऱ्या फॅमिली सलून मेकअप स्टुडिओ व स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालवला जात आहे. अशी गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी 13 नोव्हेंबर रोजी या पार्लरवर छापा टाकला.

या कारवाईत पार्लरच्या नावाखाली मुलींचा वापर करून अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या दुकान संचालकाला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी ब्युटीपार्लरच्या महिला संचालिकाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 च्या कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here