गोंदिया | देवेंद्रचा अपघातात जागीच मृत्यू…

अमरदिप बडगे
गोंदिया प्रतिनिधी

तिरोडा पोलीस स्टेशन अतर्गत येत असलेल्या इंदोरा बु येथील देवेंद्र राऊत वय 45 यांचा संतुलन बिघडल्याने मोटार सायकल रस्त्याच्या बाजूला दगडावर जाऊन आडळली दगडाचा डोक्यावर मार लागल्याने देवेंद्र राऊत चा भुराटोला नाल्यावर खैरलांजी तिरोडा मार्गावर आज सकाळी 10 वा च्या दरम्यान मृत्यू झाला.

देवेंद्र राऊत हा आपल्या मित्राला सोडण्यासाठी मोटारसायकल क्रमांक MH35 Q3741 तिरोडा येथे गेला होता. तिरोडा वरुन गावी इंदोरा बु ला येत असताना घडली .तिरोडा पोलिसांना माहिती मिळताच तिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

व पंचनामा करुन प्रेत स्वविछेदन साठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आले. व स्वविछेदन डॉक्टर यांनी करुन नातेवाईक यानां देण्यात आले. पुढील तपास तिरोडा पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here