Gondia Breaking | रोडच्या बाजूला असलेल्या खड्यातील पाण्यात बुडुन मायलेकांचा दुदैवी मृत्यू…

गोंदिया – अमरदिप बडगे

तिरोडा तालुक्यातील मलमुरी मेंढ़ा रोडच्या बाजुला असलेल्या खड्यातील पाण्यात बुडुन मुलाचा व आईचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज 14 आगष्टला दुपारी 1:30 मिनिटांनी झाल्याचे पोलिसानी सांगीतले.

मलपुरी मेंढ़ा येथील रोडच्या बाजूला असलेल्या खड्याजवळ शौच धुण्यासाठी गेला असता त्याचा तौल गेला आणि पाण्यात बुडाला त्याला वाचविण्यासाठी त्याची आई गेली असता तिच्याही मृत्यू झाला. मुलाचे नाव सिराज ललीत ठाकुर वय 6 वर्षे व आई रिहा ललीत ठाकुर वय 30 वर्षे दोन्ही राहणार मलपुरी येथील रहिवासी आहेत.

दोघानां गावच्या नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात तिरोडा येथे पाठविण्यात आले.तिरोडा पोलिस स्टेशन अंतर्गत घटनेची नोंद करण्यात आली असून घटनास्थळी आमदार अभिजीत वंजारी ,माजी आमदार दिलीप बन्सोड काँगेस नेते गप्पु गुप्ता यांनी भेट दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here