ग्रामपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभार!…ग्रामसेवक आहेत का? जनतेला पडलेला प्रश्न…

गावात घाणीचे साम्राज्य प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे जाणून बुजून दुर्लक्ष.
( सावित्रीबाई फुले बाल संस्कार केंद्र घाणीच्या विळख्यात)

बुलढाणा – अभिमान शिरसाट

चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघाची ओळख असलेल्या सावना गावाची तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका असते परंतु गावातील भोळ्या जनतेचा राजकारण्यांनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेहमी उपास केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ तसेच सावित्रीबाई फुले बाल संस्कार केंद्र जवळ तथा गावातील अंगणवाडी जवळ घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे कोरोना महामारी मुळे गावकरी त्रस्त असून यामध्ये पाच ते सहा फुटापर्यंत गाजर गवत उगवलेले असून गावातील मारुती मंदिरा पासून ते बुद्ध विहारा पर्यंत मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

गावातील नागरिकांची या रस्त्याने नेहमीच वर्दळ असते सदर रस्त्याने पदचारी माणसांना चालणे कठीण होऊन बसले आहे गावातील समस्या गंभीर असताना सुद्धा गावातील प्रशासन याबाबतीत गेंड्याची कातडी ओढून गप्प आहे.

गावामध्ये गावचा विकास करणारा तथा स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निवारण करणारा ग्राम विकास अधिकारी गावाला आहे का? असा प्रश्‍न जन माणसाकडून उपस्थित होताना दिसत आहे?

गावातील मतदारांच्या भरवश्यावर तालुक्यातील तथा जिल्ह्यातील राजकारण करणारे लोकप्रतिनिधी तथा प्रशासनातील जबाबदार अधिकारी सदर प्रकरणी गांभीर्याने घेतील काय? आणि मूलभूत समस्यांचे निवारण करतील काय?असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here