Gold Price Today | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे दर

न्यूज डेस्क :- सोने खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. 2021 एप्रिलच्या शेवटच्या दिवशी आणि या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने स्वस्त झाले.लग्नाच्या मोसमात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे सोन्याचे खरेदीदार खूप खूष आहेत. शुक्रवारी या व्यापार आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सोन्याच्या दर प्रती 10 ग्रॅममागे 191 रुपयांनी स्वस्त झाले.

शुक्रवारी सोन्याचा भाव 191 रुपयांनी घसरून 46,283 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यापूर्वी गुरुवारी सोन्याच्या दरात प्रती 10 ग्रॅम 46,474 रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 42817 रुपयांवर पोहोचली, तर 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 35057 रुपयांवर गेली.

सोन्यासह चांदीच्या दरातही शुक्रवारी घट झाली. शुक्रवारी चांदीच्या किमतीत 1,062 रुपयांची घसरण नोंदली गेली. या किंमतीमुळे चांदीचा दर कमी होऊन 67,795 रुपये झाला. गेल्या गुरुवारी चांदी 68,857 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती.

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,769 डॉलर होता, तर चांदी स्थिर प्रति औंस 25.92 डॉलरवर कायम आहे. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.24 टक्क्यांनी वधारून ते 1,772.50 डॉलर प्रति औंस झाले.

सोने बर्‍याच काळापासून प्रति 10 ग्रॅम 47000 रुपयांच्या पातळीवर आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सध्या सोन्यात गुंतवणूक करायची असेल किंवा तुमच्या कुटुंबातील लग्नासाठी खरेदी करायची असेल तर सध्या सोनं 47 हजार आहे. तर आपल्यासाठी सोन्याची खरेदी करण्याची ही योग्य संधी असल्याचे सिद्ध होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here