Gold Price Today | सोने-चांदी बाजारात तेजी…जाणून घ्या नवीन भाव..!

न्यूज डेस्क :- सराफा बाजारात बुधवारी सोन्याचांदीच्या भावात थोडीफार घसरण झाल्यानंतर काल गुरुवारी सोन्या-चांदीमध्ये वाढ झाली. सोन्याचा भाव 159 रुपयांनी वाढला, त्यानंतर दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत दहा ग्रॅम 46,301 पर्यंत खाली आली आहे.चांदीच्या दरातही 206 रुपयांची वाढ झाली. चांदीची किंमत प्रति किलो 67,168 रुपये होती. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 66,962 वर बंद झाला होता.

दुसरीकडे सोन्याच्या जोरदार मागणीमुळे सट्टेबाजांनी नवीन सौदे खरेदी केल्यामुळे गुरुवारी वायदा व्यापारात सोन्याचे भाव 272 रुपयांनी वाढून 46,880 रुपये झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून महिन्यात डिलिव्हरी सोन्याचे भाव 272 रुपये किंवा 0.58 टक्क्यांनी वाढून, 46,880 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. त्यात 11,629 लॉटमध्ये व्यापार झाला.त्याचबरोबर चांदीच्या वायद्याचे दरही वाढले आहेत. गुरुवारी स्पॉट्स मागणीमुळे व्यापा-यांनी आपल्या सौद्यांचा आकार वाढविला आणि त्यामुळे चांदीचे वायदे 471 रुपयांनी वाढून 68,109 रुपये प्रतिकिलोवर गेले.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये मे महिन्यात डिलिव्हरीसाठी चांदी 471 रुपयांनी किंवा 0.7 टक्क्यांनी वाढून 68,109 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली, ज्यात 9,258 लॉटची उलाढाल झाली.

(ही बातमी महाव्हाइस न्यूज टीमने संपादित केलेली नाही. ती थेट सिंडिकेट फीडवरून प्रकाशित केली गेली आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here