Gold Price Today | सोन्या चांदीच्या किंमती घसरल्या…जाणून घ्या आजचे भाव

न्यूज डेस्क :- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. कित्येक दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या किंमती पुन्हा खाली आल्या. जरी ही पडझड किरकोळ आहे. सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमती कमी झाल्या.

सोन्याच्या किंमती 57 रुपयांनी घसरल्या.या घसरणी नंतर सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,070 रुपये झाले. याआधी शुक्रवारी सोन्याच्या दरात 10 ग्रॅम 46,127 रुपयांवर बंद झाला होता. चांदीची चर्चा केली तर ती 270 रुपयांनी घसरून 66,043 रुपये प्रतिकिलोवर आली. शुक्रवारी चांदी 66,313 रुपयांवर बंद झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औंस 1738 डॉलरवर घसरली तर चांदी साधारणपणे 25.08 डॉलर प्रति औंसवर कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, “स्पॉटची किंमत 1738 डॉलर प्रति औंसपर्यंत न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर सोन्याची घसरण झाली.”

लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किंमतीत स्थिर वाढ होत आहे. सध्या सोन्याचे दर 10 ग्रॅम 46000 रुपयांच्या पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आता सोन्यात गुंतवणूक करायची असेल किंवा तुमच्या कुटुंबातील लग्नासाठी खरेदी करायची असेल तर आता सोनं 46 हजारांवर आहे.

तर आपल्यासाठी सोन्याची खरेदी करण्याची ही योग्य संधी असल्याचे सिद्ध होऊ शकते. खरं तर, 1 एप्रिलला दिल्लीत सोन्याची स्पॉट किंमत 44,701 रुपये होती, त्यानंतर 5 एप्रिलला ती 44,949 झाली आणि 8 एप्रिलला ते प्रति 10 ग्रॅम 46160 रुपये होते. सोमवारी सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 46,070 रुपयांवर गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here