दिराच्या प्रेमात वेडी होऊन…२ मुलांची माता गेली पळून…!

न्यूज डेस्क :- भागलपुर: प्रेमासाठी कोणतेही वय नसते आणि ते कधीही घडू शकते. अशीच एक घटना बिहारमधील भागलपूरमधून समोर आली आहे जिथे एक महिला तिच्या नवऱ्याच्या भावाच्या प्रेमात पडली. दोन मुलांची आई स्वत:च्याच दिराच्या प्रेमात पडल्यामुळे त्यांना कुटुंबाने पकडले.

सूचनाही देण्यात आल्या परंतु दोघांचा जोर त्यांच्या प्रेमावर होता.आपल्या दिरावर प्रेम करणारी स्त्री आपल्या स्वप्नांमध्ये मग्न होऊ लागली आणि प्रेमाची स्वप्ने सजवू लागली. आणि एक दिवस असा कि आला जेव्हा ती तिच्या प्रियकर अर्थात दिरासोबत घराबाहेर पळून गेली.

ती बाई अचानक सुमारे चार दिवसानंतर परत आली,जेव्हा दोन मुलांची आई तिच्या प्रियकरसमवेत पळून गेली तेव्हा गावात खळबळ उडाली. महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

गावात आल्यावर ती आपल्या दिरासोबत राहु लागली. तेव्हा कुटुंबाने प्रतिकार केला. यानंतर, सर्व लोकांनी मुलांचे भविष्यबद्दल सांगून तिला पटविण्याचा प्रयत्न केला पण महिलेवर त्याचा काही परिणाम झाला नाही. दोघांनाही पोलिसांसमोर हजर करण्यात आले होते पण तिने आपल्या प्रियकर सोबत राहण्याचा हट्ट धरला. पोलिसांनी दोन्ही बाजूंकडून लेखी निवेदने घेतली असून प्रकरण सोडविण्यासाठी महिला हेल्पलाईनवरून समुपदेशकाला बोलविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here