Friday, March 29, 2024
HomeAutoगोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सला लि-आयन बॅटरीसाठी आयसीएटी प्रमाणन मिळाले...

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सला लि-आयन बॅटरीसाठी आयसीएटी प्रमाणन मिळाले…

Share

न्युज डेस्क – गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या उत्पादनांच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने घोषणा केली आहे की, रूचिरा ग्रीन यांच्याद्वारे उत्पादित केल्या जाणाऱ्या त्यांच्या २०० एएच लिथियम-आयन बॅटरी पॅकला इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्‍ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी)कडून अमेन्डमेंट-३ फेज-२ अंतर्गत एआयएस १५६ प्राधिकरण मिळाले आहे.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने त्यांची ई-ऑटो इब्लू रोझी व ई-लोडर इब्लू रेनोमध्ये या प्रमाणित बॅटऱ्यांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. बॅटरीची प्रखर चाचणी करण्यात आली आणि नवीन सुधारणेअंतर्गत आयसीएटीद्वारे अनिवार्य असलेल्या सर्व सुरक्षितता व कार्यक्षमता घटकांची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थापित करण्यात आली आहे.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्हणाले, ‘‘गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सची स्थापना केल्यापासून आम्ही संपादित केलेला हा मैलाचा दगड आहे. बॅटरी ईव्हीची मुलभूत घटक आहे आणि आमच्या २०० एएच पॅकला आयसीएटी प्रमाणन मिळण्यासह आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नवीन नियमांचे पालन करतो.

राइडरची सुरक्षितता लक्षात घेत दर्जेदार उत्पादने निर्माण करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. हे प्रमाणन ग्राहकांमध्ये जागरूकता अधिक वाढवेल आणि आमच्या उत्पादनांवरील विश्वास वाढवण्यास मदत करेल.’’

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स सध्या ई-ऑटो (एल५एम) इब्लू रोझी आणि ई-सायकल श्रेणी इब्लू स्पिन व इब्लू थ्रिल यांची विक्री करते, ज्या तीन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहेत. कंपनीने आपल्या नेटवर्क विस्तारीकरण धोरणाचा भाग म्हणून देशभरात २८ डिलरशिप्स सुरू केल्या आहेत.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: