रखवालदारानेच चोरल्या बकऱ्या व कोबंड्या…पातूर पोलीस स्टेशनला तक्रार

निशांत गवई,पातूर

पातूर : पोलीस स्टेशन अंतर्गत भंडारज शेतशिवरामध्ये असलेल्या फिर्यादी उल्हास मोकळकर वय५६ यांचे सासरे बबनराव धुरतकर राहणार अकोला ,यांची शेती भंडारज शेतशिवरात असून यांच्या शेतात रखवालदार असलेल्या दाम्पत्य व्यक्तीने कोंबड्या व बकऱ्या चोरी गेल्याची तक्रार पातूर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.

भंडारज येथील शेतशिवरामध्ये २०१७ पासून कोंबड्याचे व बकर्यांचे फार्म आहे.सोबतच एक एकरात हळदीचे पीक सुद्धा घेतले जात आहे.या सर्व शेतीवर व फार्म वर रखावली म्हणून कोंबड्या आणि बकऱ्याची चराई करण्यासाठी रखमा उर्फ सागर सोनूने व त्यांची पत्नी लताबाई सोनुने मुक्काम आमखेड पोस्ट अंबासी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांना प्रतिमहिना ९ हजार रुपये प्रमाने रखावली साठी ठेवण्यात आले होते.

सदर दाम्पत्य असलेल्या आरोपीचे पातूर तालुक्यातील उमरा या गावी जाणे येणे सुरू होते.पती पत्नी यांनी १७ जानेवारी ला ७ बकऱ्या किंमत ६० हजार रुपये आणि ३ कोंबड्या किंमत ३ हजार असे ६३ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची संशयित म्हणून पातूर पोलीस स्टेशनला १९ जानेवारी रोजी तक्रार देण्यात आली आहे.यांच्यावर ३७९ अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे.पुढील तपास पातूर पोलीस स्टेशन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here