हाथरसच्या पीडीतेला न्याय देऊन आरोपींना फाशिची शिक्षा व्हावी…

चिखलीः उत्तर प्रदेश येथील हाथरस,(युपी) येथील पीडीत मुलीवर झालेल्या अन्याच्या निषेधार्थ दि. 5 आक्टों ला निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी दिलेल्या सुचने नुसार मोर्चा न काढता सर्व बहुजन चळवळीचे पदाधिकारी कार्यकर्ते तहसिल मधे जमा होऊन मा. महामहिम राष्टपती नवी दिल्ली, मा. अध्यक्ष अनुसुचित जाती जमाती आयोग नवी दिल्ली, व मा. जिल्हाधिकारी बुलडाणा यांना मा. तहसिलदार चिखली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमुद आहे की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडीत तरुणीवर अमानुष अन्याय अत्याचार करुन निघृण हत्या करण्यात आली व तिचे प्रेत सुध्दा तिच्या घरच्यांना देण्यात आले नाही. तसेच तिचा उपचार सुध्दा होऊ दिला नाही. उलट स्थानिक प्रशासन हे त्या नराधमांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी त्या पीडीतेचे प्रकरण जलद गती न्यायालयात ठेऊन आरोपींना फाशिची शिक्षा देण्यात यावी.

तसेच आरोपींचा बचाव करण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. या मागण्यांचे निवेदण देण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ चिखली शहर व तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व समस्त बहुजन बांधव यावेळी गजानन वायाळ तालुका अध्यक्ष राष्टवादी, शंतनु बोंद्रे प्रदेश प्रतीनीधी राष्टवादी, प्रदिप पचेरवाल माजी नगरसेवक, विजय नकवाल नगरसेवक,

दत्ता सुसर नगर सेवक, नंदु कर्‍हाडे युवा सेना, प्रशांतभैया डोंगरदिवे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मानवाधिकार संघटन, भाई सिध्दार्थ पैठणे जिल्हा अध्यक्ष स्वारीप, प्रशांत ढोरे पाटील विदर्भ प्रदेश अध्यक्ष रयतक्रांती संघटना, आनंद गैची प्रदेश अध्यक्ष यूवा वाल्मीकी समाज,समाधान भटकर, प्रितम गैची शिवसेना, बाळु भिसे वंचीत आघाडी, विजय सोनवाल,विनोद कळसकर वंचीत नेते,अनिलसिह चौहाण ता.अ. रयत, प्रशांत झीने ता. उपाध्यक्ष रा.का. राजेंद्र सुरडकर, व्दारकादास नकवाल, भरत जोगदंडे जिल्हा संपर्क प्रमुख,दिपक सोनवाल, सचिन पडघान, राहुल नकवाल, अनिल नकवाल, निलेश सोनवाल, हिरा ढंढोरे, दिनेश गैची, कीरण सोनवाल, आकाश पचेरवाल, संतोष टिपले, सतिष पैठणे युवा पॅथर अध्यक्ष, डाॅ मुरलीधर खलसे, दत्तु परीहार, हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here