धान पीक खरडलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्या;माजी जि प सदस्य नलिनी खरकाटे यांची मागणी…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येऊन तालुक्यातील शेकडो हेक्टर धान शेती पाण्याखाली बुडाली होती मात्र पूर ओसरताना पाण्याखाली असलेली धान शेती पूर्णतः खरडून निघाल्याने शेतक-यांचचे धान पिक पूर्णतः नष्ट झाले असल्याने धान पीक खरडलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्या अशी मागणी माजी जिप सदस्य नलिनी खरकाटे यांनी केली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत प्रामुख्याने धान व सोयाबीन या पिकांचा विमा काढून घेतलेला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडताना शेतकऱ्यांनी कशीबशी धान पिकाची रोवणी काही प्रमाणात आटोपली होती.

उर्वरित रोवणी आगस्ट महिन्यांमध्ये करण्यात आली. मात्र ऑगस्ट महिन्याच्या मध्यार्धात जिल्ह्यात व तालुक्यात अतिवृष्टी होऊन चुलबंद नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेकडो हेक्टर पिक शेती पुराचे पाणी ओसरताच पुर्णत: खरडून निघाली आहे.

या घटनेची दखल घेऊन महसूल प्रशासनासह कृषी विभागाने तालुक्यातील धान शेती व अन्य पीक शेती खरडवून निघालेल्या भागाची पाहणी चौकशी व पंचनामे करून पिक विमा मंजूर होण्यासाठी कार्यवाही करावी अशी देखील मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here