अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत द्या…!

बुलढाणा – अभिमान शिरसाट

अतिवृष्टीमुळे या वर्षी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्‍टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करावी अशी मागणी महादेवराव जानकर यांचे आदेशावरून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सुभाष राजपूत यांचे नेतृत्वात चिखली तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुसकान भरपाई न मिळाल्यास तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देते वेळेस मा. सुभाष राजपूत यांचेसह अनिल वाकोडे ,मनोज जाधव, विजय सोरमारे, भारत जोगदंडे, शिव शंकर शेळके, सुमित जाधव ,गणेश देशमुख ,दिलीप माळवंडे हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here