सांगलीतील पूरग्रस्तांना २०१९ च्या धर्तीवर सरसकट भरपाई द्या…अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या अडवू…पूरग्रस्त व्यापारी, नागरिक आक्रोश बैठकीत इशारा…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना 2019 मध्ये फडणवीस सरकारने वेळेत आणि भरीव अशी मदत दिली होती. याच धर्तीवर आताच्या महाविकास आघाडी सरकारने सरसकट पूरग्रस्तांना भरपाई द्यावी. अन्यथा भविष्यात मंत्र्यांच्या गाड्या अडवू असा गर्भित इशारा पूरग्रस्त व्यापारी,नागरिक आक्रोश बैठकीत देण्यात आला. बैठकीस भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार आणि माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी दिला आहे.

यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, व्यापारी महासंघाचे समीर शहा, सतीश साखळकर,मोटार गॅरेज असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव सत्याळ, नगरसेवक स्वातीताई शिंदे, भारती दिगडे, युवराज बावडेकर, अमर पडळकर, अविनाश मोहिते, स्मिता पवार, रेखा पाटील, माधुरी वसगडेकर ,अजय वाले, प्रफुल्ल ठोकळे आदित्य पटवर्धन ,प्रियानंद कांबळे आदींसह पूरग्रस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here