शेतक-यांना कापसाचे चूकारे तातडीने द्या..! सम्राट मित्रमंडळाची मागणी…

अहमदपूर – बालाजी तोरणे

शेतक-यांच्या कापूस खरेदीचे शासनाने तातडीने चुकारा द्यावेत अशी आग्रही मागणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने यूवक नेते डाॅ सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.

येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कडे दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,अहमदपूर चाकूर जळकोट आदी भागातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती.कापूस पिकल्यानंतर तो शासनाने खरेदी करावा ता साठी शेतकरी आग्रही होते. शासन नियमाप्रमाणे ऑनलाईन नोंदणीही शेतक-यांनी केली होती.

दरम्यान सम्राट मित्रमंडळाने अहमदपूर येथे कापूस खरेदी केंद्र चालू करण्याची मागणी शासनाकडे केली मात्र अहमदपूर ऐवजी रेणापूर येथे या केंद्राची सुरूवात मोठ्या थाटामाटात करण्यात आले.नाविलाजाने या तिन्ही तालुक्यातील लोक रेणापूर केंद्रावर आपला कापूस दिला.परंतू एक महीना उलटून गेला तरी ही खरेदी केलेल्या कापसाचे चूकारे(पैसे) अद्याप दिलेले नाहीत.

यंदा लाॅकडावून मूळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे.तेंव्हा शासनाने तातडीने कापसाचे चूकारे द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर मित्रमंडळाचे अध्यक्ष डाॅ. सिध्दार्थकूमार सूर्यवंशी,अँड.सूभाषराव सोनकांबळे,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,अजय भालेराव,लखन गायकवाड,धम्मानंद कांबळे,गफारखान पठाण,मोहम्मद पठाण, अली,सय्यद नौशाद,शरद बनसोडे,मल्हारी सोनकांबळे,शहारूख पठाण,सचिन बानाटे,बालाजी मस्के आदींची नांवे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here