‘सही रे सही’ फेम अभिनेत्री गीतांजली कांबळे काळाच्या पडद्याआड…

गणेश तळेकर,मुंबई

‘सही रे सही’ फेम अभिनेत्री गीतांजली कांबळे याचं आज पहाटेच्या दु:खद निधन झाले असून मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीत शोककळा पसरली आहे ते गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर मुंबईतील चर्नीरोड येथील सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

शनिवारी अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे त्यांचे मुंबईमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. गीतांजली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण याठिकाणच्या रहिवाशी होत्या. मुंबईत त्या कामानिमित्त आल्या होत्या. याठिकाणी त्यांनी त्यांची अशी ओळख मिळवली होती. मात्र त्यांना या काळात कॅन्सरने ग्रासले होते, गेला काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते.

केदार जाधव दिग्दर्शित ‘सही रे सही’ या नाटकात अभिनेता भरत जाधवबरोबर गीतांजली कांबळी यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच मालवणी नटसम्राट दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकातही त्यांची भूमिका गाजली होती. गीतांजली यांनी 50 हून अधिक व्यावसायिक नाटकात अभिनय केला आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘टाटा बिर्ला’, ‘गलगले निघाले’ या सिनेमात देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

काही मीडिया अहवालानुसार 2012 पासून त्या कर्करोगाचा सामना करत होत्या. त्यांची आर्थिक परिस्थितीही अगदी बेताची होती. आयुष्यभर त्यांनी मालवणी नाट्यक्षेत्रासाठी काम केले. कोरोना काळातील लॉकडाऊनध्ये नाटकांचे दौरे बंद असल्याने त्यांच्यासमोरील संकट आणखी वाढले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मदतीचे आवाहन देखील केले होते. त्यांच्या या संपूर्ण प्रवासात गीतांजली यांचे पती लवराज कांबळी त्यांच्याबरोबर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here