मूर्तिजापूर | गीतांजली एक्स्प्रेसचा मागील डबा घसरला…काटेपुर्णा ते बोरगाव मंजू दरम्यानची घटना…

मूर्तिजापूर – मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या काटेपुर्णा ते बोरगाव मंजू दरम्यान हावड्यावरून मुंबईला जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसचा मागील डबा रुळावरून घसरल्याने उप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः थांबून गेलीय.

या गाडीचा मागील डबा घसरताच मोठा आवाज आल्याने प्रवाश्यांची मोठी तारांबळ उडाली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसून घटनास्थळी रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तर घसरलेल्या डब्याला पुन्हा रुळावर आणण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here