आईनेच केली चिमुकलीची हत्या !…सांगलीतील धक्कादायक घटना

ज्योती मोरे,सांगली
दोन वर्षे होऊनही मुलगी इतर मुलांसारखं बोलत नाही शिवाय ती मतीमंद असल्याच्या संशयानं,सांगलीतील संजयनगर भागातील दडगे प्लॉट मध्ये राहणाऱ्या रेवती संजय लोकरे या महिलेनं,आपल्या दोन वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

कुमारी ज्ञानदा संजय लोकरे असं या मयत मुलीचं नांव असून, सदर प्रकारानंतर मुलीच्या आजीनं आणि शेजाऱ्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं.

मात्र तपासणी दरम्यान तिच्या गळ्यावर खुणा दिसल्यानं, डॉ.प्रभाकर जाधव यांनी, संजयनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांना पाचारण करुन, झाला प्रकार निदर्शनास आणून दिला.त्यानुसार सदर महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, तिच्यावर 147/2021आणि 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here