पातुर | गिट्टी ने भरलेल्या ट्रॅक्टरची दुचाकीच्या धडकेत मुलगी ठार…वडील जखमी

पातूर :- पातूर ते बाळापूर रस्त्यावरन ट्रॅक्टर वाडेगाव कडे जात असताना देऊळगाव बसस्थानक जवळ दुचाकीला जबर धडक लागल्याने मोठा अपघात घडल्याची घटना गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सूत्राने दिलेल्या माहिती नुसार गिट्टीने भरलेल्या ट्रॅक्टर भरधाव वेगाने येत असताना समोर असलेल्या दुचाकीस्वार वडील व मुलगी विवरा येथे घरी जात असताना मागच्या बाजूने धडक दिली.

यामध्ये वडील खाली कोसळले तर मुलीच्या अंगावरून चाक गेल्याची माहिती मिळाली आहे.स्थानिक देऊळगाव येथील नातेवाईकांनी यांना उचलून उपचारसाठी पाठविण्यात आले असता कु पल्लवी अनिल धोत्रे हिला जास्त मार लागल्याने गँभिर जखमी असल्याने त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले.

या मुलीचे चार दिवसावर लग्न राहिले असल्याचे त्यांच्या नातेविककडून सांगण्यात आले आहे.ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली असून याबाबत पातूर पोलीस तपास करीत आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here