अखेर घाटकुरोडा गावाला मिळणार पाणी प्रहारच्या विरुगिरी आंदोलनाला यशप्राप्ती…

गोंदिया – अमरदिप बडगे तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा हे गाव नदी काठी असून शासनाला या गावातून रेती घाटाच्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो, ह्या गावला मात्र या अनेक वर्षांपासून धापेवाडा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 मध्ये येत असून सुद्धा आज पर्यंत शेतीकरिता पाणी देण्यात आले नाही .

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घाटकुरोडा गावाला पाणी देण्यात यावे ह्या मागणीला धरून आंदोलन केले, प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलक आक्रमक झाले. व पाण्याच्या टाकीवर विरुगिरी स्टाईल ने आंदोलन केले तरीही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती.

त्यामुळे आंदोलकांना भर थंडीत पाण्याच्या टाकीवर एक रात्र व 2 दिवस पाण्याच्या टाकीवर राहावे लागले तेव्हा प्रशासनाच्या वतीने आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कार्यकारी अभियंता व इतर पदाधिकारी यांनी आंदोलन कर्त्यांना भेट देऊन घाटकुरोडा गावाला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गावाला पाणी मिळवून देण्याठी 100 टक्के प्रयत्न करू असे अश्वानाचे लेखी पत्र देण्यात आले.

त्या आधारावर प्रहारचे गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, तिरोडा तालुका प्रमुख प्रदीप निशाने, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, प्रहार कार्यकर्ता सुरेंद्र सूर्यवंशी, वामन हजारे, सरपंच प्रमोद खेवले, राजन नरोले, तिलक पारधी, रवी फुलझले, मुन्नाभाऊ दमाहे, असंख्य आंदोलनकर्ते, शेतकरी व प्रहार कार्यकर्ते यांनी आंदोलन मागे घेतले.त्या आधारावर कालवा सल्हागार समितीच्या झालेल्या बैठकीत समितीने घाटकुरोडा गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतल्याने प्रहारच्या आंदोलनाला यशप्राप्ती झाली.

शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून वाट पाहून सुद्धा पाणी मिळाले नाही मात्र प्रहारच्या प्रयत्नाने ते शक्य झाल्याने शेतकऱ्यांत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रहारच्या आंदोलनाचे कौतुकास्पद चर्चासत्र सगळीकडे सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कालवा दुरुस्तीचे करण्याचे काम अद्यापही 10 दिवसाच्या आत सुरु करण्यात येईल असे लिखित स्वरूपात प्रशासनाने पत्र देऊनही काम सुरु न केल्याने प्रहार गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने, प्रहार कार्यकर्ता वामन हजारे , उरकुड उके यांनी प्रशासनाच्या कार्यप्रणाली बाबद तक्रार प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केलेली आहे.

व त्याच बरोबर अर्जुनी/मोरगाव, तालुका अध्यक्ष कार्तिक मानकर, सालेकसा तालुका सचिव अजय मच्छीरके, आमगाव तालुका अध्यक्ष सुनिल गिरडकर, तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रहारचे संस्थापक/अध्यक्ष बच्चू कडू यांच्याहस्ते प्रहार जनशक्ती पक्षात अमरावती येथील जनसंपर्क कार्यालयात प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here