बोगस बियाणे कंपन्यांचा तात्काळ माज उतरवा…मुख्यमंत्रांना निवेदन

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू झाला असून या खरिप हंगामात तात्काळ नगदी चे पीक म्हणून ओळखल्या जाणारे सोयाबीन च्या पिकाकडे पाहले जाते, व यवतमाळ जिल्यात सोयाबीन चा पेरा लक्षवर्धक असून सोयाबीन च्या बियाण्याची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होते नेमका याच बाबीचा फायदा काही बोगस बियाणे कंपनीने उचलला व यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री करण्यात आलेत,

मुळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीत सोयाबीन हजारो शेतकऱ्यांचे उगवलेच नाही, मुळात कमी उगम क्षमता असलेले बोगस बियाणे यासाठी पूर्णपणे जवाबदार असून शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीचे संकट ओढावलेले असून यासाठी खालील मागण्या मुख्यमंत्रांकडे करण्यात आल्यात,


यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ बोगस बियाणे खरीददार ग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना तात्काळ मोफत बियाणे पुरविण्यात यावेत.

यवतमाळ जिल्ह्यात विक्री करण्यात आलेले बोगस सोयाबीन चे कंपनीची यादी करून विना अटी त्यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कायमस्वरूपी त्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी. पीक विमा योजने अंतर्गत विशेष बाब म्हणून अश्या बोगस बियाणे ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी


तरी वरील मागण्याचा विचार करीत तात्काळ कारवाही करण्याची मागणी यावेळी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी व यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने दिलेल्या निवेदनातून केलेली आहे या वेळी अशोकराव बोबडे, प्रवीण देशमुख,सुरेश चिंचोळकर, रवी ढोक, दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड यांनी केलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here