अखिल भारतीय क्षत्रिय युवा महिला प्रदेश महामंत्री पदी सौ.पूजा उदयसिंह चौहान यांची निवड…

नांदेड – महेंद्र गायकवाड

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महाराष्ट्राच्या युवा महिला पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून युवा महिला महामंत्री पदी बिलोली येथील सौ. पूजा उदयसिंह चौहान यांची निवड राष्ट्रीय युवा अध्यक्षा महिला सौ प्रभा ललित सिंह व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला युवाच्या सौ शिल्पा दिपकसिंह चौहान यांनी केली आहे.

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा ही भारतात क्षत्रिय समाजाच्या अडीअडचणी, अन्याय,अत्याचार व सामाजिक प्रश्न याविषयी लढणारी संघटना असून क्षत्रिय समाजांच्या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सज्ज अशी संघटना आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते राणा उदयसिंह चौहान यांच्या पत्नी सौ. पूजा उदयसिंह चौहान यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने अखिल भारतीय क्षत्रिय युवा महिला प्रदेश महामंत्री पदी पूजा चौहान यांची निवड केली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल अध्यक्ष कुंवर हरीवंशसिंह ठाकुर,पंकज सिंह ठाकुर महासचिव,राजेंद्र सिंह राजपूत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,दिपकसिंह ठाकुर प्रदेश सचिव महाराष्ट्र,विभागीय अध्यक्ष शरदसिंह चौधरी, नांदेड जिल्हाध्यक्ष अर्जुनसिंह ठाकूर,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष रणवीरसिंह चौहान,

विद्यमान नगराध्यक्षा सौ. मैथिली संतोष कुलकर्णी, न. प. उपाध्यक्ष मारोती पटाईत,पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड,नगरसेवक प्रकाश पोवाडे,अरविंद पवनकर,विकास पानकर,मोनू चौहान आदीसह अनेकांनी त्यांचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here