गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी…

फोटो -सौजन्य गुगल

माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे की, गौतम गंभीर यांना ISIS काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. खासदार गौतम गंभीर यांची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 9.30 च्या सुमारास ISIS काश्मीरने गौतम गंभीरला त्याच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा मेल पाठवला. या मेलमध्ये आम्ही तुला (गौतम गंभीर) आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकू, अशी धमकी देण्यात आली आहे.

हा ई-मेल मिळाल्यानंतर गंभीरने पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे सोपवण्यात आला आहे. सखोल चौकशीनंतरच हे स्पष्ट होईल की हा खरोखरच धमकीचा मेल आहे की कोणीतरी जाणूनबुजून केलेला खोडसाळपणा तर नाही ना? याचा तपास दिल्ली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here