घाटकोपर | शिवकृपा सोसायटीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य…दुर्गंधीमुळे लहान मुले आणि जेष्ठ नागरीकांना सुरू झाला श्वसनाचा त्रास…

धीरज घोलप

घाटकोपर मधील पार्क साईट येथील आनंद गड , शंकर मंदिर समोरील शिवकृपा सो.मध्ये पडीत शौचालयच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे आणि डेंबरेज चे साम्राज्य निर्माण झाले आहे.

या बांबत स्थानिकांनी वारंवार म.न.पा ला तक्रार तरून सुध्दा म.न.पा अधिकारी या कचऱ्याचे आणि डेंबरेज कडे बघून कानाडोळा करत आहे.महत्वाचे म्हणजे या कचऱ्यामुळे संपूंर्ण विभागा मध्ये दुगंधी पसरली आहे.

मध्ये तर आरोग्य विभागाचे अधिकारी येऊन सांगून गेले की , जर का हा कचरा लवकरात लवकर उचला नाही तर येथे मलेरिया आणि डेंग्गूंची साथ पसरण्यात उशीर लागणार नाही.

या अधिकार्याचे म्हणे खरे ठरले आहे.खरंच आता या विभागात आता लहान बालंकाना डेंग्गूंची आणि मलेरियाची लागवण झाली आहे. या कचऱ्यामुळे विभागातील लहान मुंलाना आणि जेष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास मोठा त्रास सहंन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here