पातूर येथील गणपती बाप्पानी घेतला निरोप;नियमांचे पालन करीत पार पडला निरोप समारंभ…

सार्वजनिक गणेश 9 व 1 खाजगी अशा एकूण दहा मंडळांनी शांततेत विसर्जन करून बाप्पांना निरोप दिला.

पातूर – निशांत गवई

पातूर शहरात आठ व शिर्ला हद्दीत एक व खाजगी मंडळ एक असे एकूण 10 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता अशी माहिती संबंधित प्रशासनाने दिली आहे यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले असून सर्व मंडळांनी covid-19 च्या नियमांचे पालन करून सर्वांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक प्रशासनाला मदत म्हणून नियमाचे पालन करून गणपती बाप्पांना निरोप दिला.

गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या थाटामाटात चालत आलेली ही परंपरा मात्र या वर्षी प्रथमच गणपती शांततेत कुठल्याच प्रकारच्या बँड, वाजंत्री,पारंपारिक वाद्य नसून यांचा वापर न करता अगदी साध्या पद्धतीने विसर्जन सोहळा पार पडण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here