नागपुरात खापरखेड्यात कुख्यात गुंडाची गळा चिरूडून निर्घृण हत्या…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर खापरखेडा मुख्य बाजारात कुख्यात गळा चिरडून हत्या केल्याची घटना बुधवारला (२०) जानेवारी रात्रीचा सुमारास स्थानिक पोलीस स्टेशन चा हाकेच्या अंतरावर घडली.घटनेला अंजाम देऊन अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.मूतकाचे नाव प्रशांत घोडेस्वार (३२ रा.वार्ड क्र.४) असे आहे.

प्रशांत मुख्य बाजारपेठेतील राजबाबा बीअर बार मध्ये रात्रीचा सुमारास दारू पीत होता अशी सुत्राकडुन माहिती आहे.अचानक रात्री ९:४५ वाजता मोहण कीराणा दुकानासमोर अज्ञात आरोपिंनी गळा चिरूडून हत्या केली.

तो सध्या अण्णामोड परिसरातील एका लॉटरीच्या दुकानात काम करायचा.खापा पोलीस स्टेशन मध्ये त्याचावर विवीध गुन्हे दाखल आहेत.सदर घटनेची माहिती खापरखेडा पोलीसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.पुढील तपास खापरखेडा पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here