गणेशपुरच्या ए क्लास जमिनीवर केले होते रातोरात अतिक्रमण
दर्यापूर(किरण होले)
-तालुक्यातील गणेश पुर गावालगत असलेली सहा एकर शेती सरकारी असल्याने या ठिकाणी एक सुंदर स्मशानभूमी व्हावी याकरिता आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या फंडातून पाच लाख रुपये टाकून स्मशानभूमी भूमिपूजन केले होते.
त्याकरिता एक एकर जागा ही सरकारी देण्यात आली होती,उरलेल्या पाच एकरवर अचानक पारधी समाजाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी रहिवाशांनी आखणी करून जागेच आपण स्वतः वाटप केले होते मग त्यावर कापडाचे पाल काट्या बांबू लावून उभारले होते
एकदमच हाहाकार उडाला कारण शासनाची जागा व त्यावर त्याच गावातल्या ग्रामस्थांचा अधिकार असताना तिचे आजूबाजूच्या परिसरातील पारधी समाज बांधव एकत्र येऊन अतिक्रमण करायला लागले होते ही बाब गणेशपुर ग्रामस्थांच्या लक्षात आली
सर्व ग्रामस्थ प्रथम बीडीओ कार्यालय दर्यापूर व नंतर दर्यापूर पोलीस स्टेशन वरून धडकले व त्यांची एकच मागणी होती की पूर्ण परिसर हा खाली करून मोकळा करावा त्याकरता तहसीलदार डॉ योगेश देशमुख ठाणेदार आत्राम बाळासाहेब रायबोले बी डी ओ दर्यापूर हे अधिकारी एकत्र येऊन यांनी चर्चा केली
व ग्रामसेवक निरंजन गायगोले यांना संबंधितांना तरीच विनाविलंब जागा खाली करण्याचे आदेश दिले व विनाविलंब संबंधितांना नोटीस देण्यास सांगितल्या जागा खाली झाल्याचा अहवाल तहसीलदार यांना देण्यात यावा बजावण्यात आले
तेव्हा सर्व गणेशपुरी ग्रामस्थ शांत झाले मात्र रात्रीतून पाला च गाव कसे बसले याचं सर्वत्र नवल होत आहे अशी जर झाले तर मग प्रत्येक गावात सरकारी जागा असून अनेक ठिकाणी जनावरांना चारण्यासाठी तिचा वापर होत आहे.