गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गांधींचा पुनर्जन्म !

गोष्ट आहे 7 जुन 1873 या दिवशीची मोहनदास करमचंद गांधी हे डर्बन ते प्रिटोरिया असा प्रवास ट्रेनने करीत होते. तेव्हा त्यांना एका ऑफिसरने ट्रेनमधून ढकलून दिले होते. कदाचित त्यादिवशी जर त्या ऑफिसरने गांधींना धक्का दिला नसता तर आज ते ‘महात्मा गांधी’ झाले नसते. वास्तविकतेत गांधींचा खरा जन्मदिवस तो. गांधी असाच जन्म घेत असतो. त्यासाठी सत्ताधीशाना एवढ्या दमाचा धक्का द्यावा लागतो. अन आता त्या धक्क्याने देशात गुरुवारी राहुल गांधींच्या रुपात गांधींचा पुनर्जन्म झाला आहे.

गुरुवारी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे हाथरस येथील बलात्कार पीडित युवतीच्या परिवाराला सांत्वनपर भेट देण्याकरिता चालले होते. परंतु मध्यरस्त्यात राहुल गांधी यांना थांबवित पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या सोबत थेट त्यांची कॉलर पकडीत धक्काबुक्की केली , त्या धक्काबुक्कीत राहुल गांधी जमिनीवर कोसळले . सत्ताधीशाना चढलेली सत्तेची मग्रुरी पुन्हा या घटनेने समोर आली. राहुल गांधी हे एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत.

सुरुवातीपासूनच देशसेवा , त्याग , बलिदान यांचे संस्कार त्यांच्यावर पडले आहे. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे पौत्र तर माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांचे चिरंजीव आहे.या देशासाठी त्यांचे व त्यांच्या परिवाराचे योगदान आजही अमौल्य असे आहे. अश्यातच उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी राहुल गांधींबरोबर केलेले वर्तन हे अतिशय निंदनीय असून राजकीय पाठबळाव्यतीरिक्त कुठलेही प्रशासन असे कर्तृत्व करूच शकत नाही.

या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले असून देशभरातील नागरिकांमध्ये उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकार विरोधात नाराजीची लाट पसरली आहे. या घटनेने उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकार यांच्या मगृरतेचा सुद्धा परिचय देशवासियांना आला आहे. जर एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार असलेल्या राहुल गांधी यांना अशी वागणूक दिली जाते तर उत्तर प्रदेश राज्यात सामान्य नागरिकांची काय गत असणार हे यावरून दिसून येते.

हाथरस पीडितेच्या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास केलेली दिरंगाई , वेळेवर उपचार न मिळणे, तसेच तिच्या परिवारावर दबाव आणून घाईघाईने अर्ध्या रात्री तिचे अंतिम संस्कार पार पाडणे असे अनेक आरोप उत्तर प्रदेश पोलिसांवर सध्या होत आहे . अश्यातच गुरुवारी राहुल गांधी हे पीडित युवतीच्या परिवाराला भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांचे राहुल गांधींबरोबर केलेले वर्तन पीडितेच्या परिवाराला भेट घेण्यापासून रोखण्याचे केविलवाणा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

जर या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी काही अनियमितता केली नाही तर राहुल गांधी , मीडिया कर्मी यांना पीडितेच्या परिवाराशी भेट घेण्यापासून का रोखत आहे असा यक्ष प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे .

एकंदरीत उत्तर प्रदेश पोलीस व सत्ताधारी यांनी दिलेल्या धक्क्याने राहुल गांधी यांच्यात अहिंसावादी महात्मा गांधींचे रूप आता सामान्य नागरिक पाहू लागले आहे. गांधींच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला नवा गांधी यानिमित्ताने जन्माला आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचे हे पाऊल नक्कीच येणाऱ्या काळात ‘गेमचेंजर’ ठरणार आहे, एवढे मात्र खरे.

  • समीर ठाकूर
    8956911749
    अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here