गांधीजींचा अहिंसेचा मार्ग आणि शास्त्रीजींची त्यागभावना श्रमजीवी संघटनेचे प्रेरणास्रोत – विवेक पंडित…

उसगाव – आज राष्ट्रपिता स्व.महात्मा गांधीजी आणि गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेले स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य भारताचे दुसरे पंतप्रधान  प्रेरणेने स्व.लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्रमजीवी संघटनेने आदरांजली अर्पण करत या दोनही महापुरुषांना अभिवादन केले.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दोन्ही महापुरुषांच्या प्रचंड त्यागाचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण केले.  गांधीजींचा अहिंसेचा मार्ग आणि शास्त्रीजींची त्यागभावना संघटनेचे प्रेरणास्रोत आहेत असे विवेक पंडित यांनी यावेळी सांगितले.

संघटनेचे मुख्यालय असलेल्या उसगाव या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला, सोबतच ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील तालुक्यात संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या अभ्यासवर्गात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.

गांधीजी आणि शास्त्रीजींच्या कार्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर, विधायक संसद एकलव्य परिवर्तन विद्यालयाचे प्रदीप खैरकर, मिलिंद कांबळे यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here