शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख याचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन…

फोटो- सौजन्य - गुगल

न्यूज डेस्क – राज्याच्या राजकारणातील एक वेगळी ओळख असलेले व तब्बल 11 वेळा आमदार राहिलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. रात्री 9 वाजताच्या दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी रुग्णालयात मागील 15 जुलैपासून उपचार सुरू होते.

मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती.दीर्घ आजाराशी त्यांची झुंज आज अखेर संपली. सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती शेकापचे मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे यांनी दिली आहे.

सर्वाधिक म्हणजेच तब्बल 11 वेळा एकाच पक्षाकडून निवडणूक जिंकणारे विक्रमवीर आमदार अशी गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. सांगोला तालुक्यात त्यांनी शेती, सहकार, पाणी, स्त्री सक्षमता यांबद्दल भरीव कामगिरी केली. अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वैचारिक बैठकीशी ते एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने राज्यातील शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा ढासळला, अशा भावना अ‍ॅड. राजेंद्र कोरडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

गणपतराव देशमुख यांच्यासमोर राजकारणातील अनेक पिढ्या घडल्या आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मुख्यमंत्र्यांचं काम त्यांनी जवळून पाहिलं. एक व्यक्ती, एकच पक्ष आणि एकच मतदारसंघ आणि 11 वेळा आमदार हे उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळच होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here