पातुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन बायस यांचा राखोंडे गणेशोत्सव मंडळाव्दारे कोरोना योध्दा म्हणून सन्मान…

पातूर – निशांत गवई

पातुर येथिल स्व.विनायक राखोंडे स्मृती गणेशोत्सव मंडळ, कान्होबा चौक पातुर यांच्या वतिने यावर्षी कोरोना संसर्ग मुळे आपला गणेशोत्सव शासकीय नियमाचे पालण करत सांध्या पध्दतीने साजरा करत.

यावर्षी आपला गणेशोत्सवा मधील देखावा हा कोरोना योध्दाना समपिर्त करत कोरोणा संसर्ग कमी करण्यासाठी व पातुर शहर कोरोना मुक्त करण्यासाठी मागिल चार महिण्यापासुन रात्रदिन कार्य करणारे डॉक्टर, पोलीस व शासकीय यंत्रणेचे अधिकारी यांच्या मधील रोज एका अधिकारी यांचा कोरोना योध्दाचा म्हणुन सन्मान करुन सत्कार करत आहे.

आज पातुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा.श्री.गजानन बायर यांचे हस्ते श्रीगणेशाची आरती करुन स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठान, पातुरचे अध्यक्ष सागर राखोंडे व विशाल राखोंडे तसेच राखोंडे परिवारा कडुन गजानन बायस यांचा सन्मान कोरोना योध्दाचा म्हणुन सन्मान पत्र, वृक्ष व किचन गार्डन किट व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here