जनावराची अवैध वाहतूक करणारे गजाआड;रामटेक पोलिसाची कार्यवाही…

राजु कापसे
रामटेक

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कांद्री चेकपोस्ट येथे दि 23/02/2021  रोजी पोलिस स्टेशन रामटेक यांनी येण्यारा जाण्यारा वाहनांची तपासणी केली असता एक 12 चक्का ट्रक क्र एम एच 18 एए 1028 या वाहनांची तपासणी केली असता

त्यामध्ये 52 गोवंश(बैल )जनावरे ज्यांना बसण्या उठण्यास योग्य जागा नसताना त्यांना इजा होईल अशा स्थितत होते.पोलिसांनी   सदर जनावरे व गाडी ची किंमत 14,08,000/ रुपये आहे असा मुद्देमाल जब्त केला असून

पोलिसांनी आरोपी अफसार कादिर कुरेशी 33 वर्ष रा इस्लामपुरा जी भोपाल, हासिन अखिल खा वय 20 रा भुदोर ता बेरसिया जी भोपाल, राहुदिईंदिन वाहिद खा वय 19 भोहरासा जी.भोपाल, फरहान वाहीद खा वय 31रा.रेड्डी हॉस्पिटल काली मंदिर इस्लामपुरा 2 न गल्ली अशा आरोपीना अटक करण्यात आली

असून अपराध क्र71/2021 कलम 11(1)(अ)(ड)(ई)(फ) प्राण्याचा छळ प्रतिबंद कायदा सहकलम 5 अ(1)(2),9 महाराष्ट्र प्राणी सुधारणा आदिनीयम कलम 429 भा. दा.वि सहकलम 119 मु .पो.का गुन्हा दाखल केला असून हि कार्यव्हावी पोलीस

अधीक्षक राकेश ओला,पोलीस उपविभागीय अधिकरी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनात  रामटेक ठाणेदार प्रमोद मकेशवर,ए पी आय शेंडगे,पी एस आय प्रमोद कोळेकर, गोविंद खांडेकर,राजू पोले ,शिवाजी दिंढे,सचिन गेडाम,आकाश,रुपेश शेंद्रे यांनी केली. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here