गडचिरोली | धानोरा व अहेरी तालुक्यात एक-एक कोरोना अहवाल पॉझिटीव्ह…सध्या सक्रिय कोरोना बाधित १५ झाले

गडचिरोली: आज धानोरा येथील संस्थात्मक विलगीकरणातील २३ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला. दि.२२ जून रोजी यवतमाळ येथून आलेल्या महिलाचा तो भाऊ आहे. त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्यानंतर त्याचा स्वॅब आज सकाळी पॉझिटीव्ह आला.


तर अहेरी येथील ५२ वर्षीय रूग्ण सीआरपीएफ मधे नोकरी करणारे आहेत. ते सुट्टीवर हैद्रबाद येथे गेले होते. परत जिल्हयात बल्लारशहा येथे रेल्वेने आल्यानंतर त्यांनी सीआरपीएफच्या वाहनाने अहेरी पर्यंत प्रवास केला. त्यानंतर वांगेपल्ली येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. आज त्यांचे अहवाल पॉझ्टिीव्ह मिळाले.


या दोन पॉझिटीव्ह अहवालानंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी ६७ वर गेली. आत्तापर्यंत जिल्ह्यात ५१ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.
तर सद्या सक्रिय कोरोना बाधित संख्या १५ झाली.

जिल्हयातील तालुकानिहाय कोरोना बाधित व कोरोनामुक्त

(आकडेवारी क्रम – एकुण बाधित रूग्ण-बरे झालेले रूग्ण-सद्या सक्रिय कोरोना बाधित)

१) गडचिरोली – ९-८-१
२) आरमोरी – ५-३-२
३) वडसा – ६-१-५
४) कुरखेडा – १०-९-१
५) कोरची – १-१-०
६) धानोरा – ५-३-२
७) चामोर्शी – ७-५-२
८) मूलचेरा –७-७-०
९) अहेरी – ५-३-२
१०) सिरोंचा –१-०-०(१ मृत्यू)
११) एटापल्ली – ८-८-०
१२) भामरागड –३-३-०

एकुण जिल्हा – ६७-५१-१५(१ मृत्यू)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here