गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन १०५ कोरोना बाधित तर १०० जण कोरानामुक्त…

गडचिरोली – मिलींद खोंड

गडचिरोली जिल्ह्यात नवीन 105 जण कोरोना बाधित आढळले. तर एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 100 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 859 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 3012 रूग्णांपैकी 2132 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवीन 105 कोरोना बाधितामध्ये : गडचिरोली येथील 19 जणांचा समावेश आहे. अहेरी येथील 17, आरमोरी येथील 3, कोरची येथील 1, कुरखेडा येथील 1, वडसा येथील 16, एटापल्ली येथील 19, धानोरा येथील 13, भामरागड येथील 8, सिरोंचा येथील 8, असे एकूण 105 जण कोरेानाबाधीत आढळून आले आहेत.

नवीन 105 बाधितांमध्ये अहेरी मधील 17 मध्ये शहर 6, रामपूर चौक 1, मरपल्ली 6 जणांचा समावेश आहे. आरमोरी येथील सर्व 3 जण शहरातीलच आहेत. भामरागड मधील सर्व 8 जण स्थानिक आहेत. धानोरा येथील 13 मध्ये 10 कटेझरी, 1 सीआरपीएफ, पन्नेमारा 1, पेंढरी येथील 1 जणाचा समावेश आहे. एटापल्ली 19 मध्ये 6 सीआरपीएफ, 7 शहरातील, एलपीसी स्टाफ 1, हेउरी मधील 5 जणांचा समावेश आहे.

गडचिरोलीमधील 19 मध्ये मारकबेाडी 1, आरमोरी रोडवरील 2, सीआरपीएफ कॉम्प्लेक्स 4, फुले वार्ड 1, शहरातील 5, कोटगल 1, लक्ष्मीनगर 4, नवेगावमधील 1 जणाचा समावेश आहे.कोरची व कुरखेडा मधील एक एक जण स्थानिकच आहेत. सिरोंचा मधील 8 मध्ये सर्वजण सथानिक आहेत. वडसामधील 16 मध्ये राजेंद्र वार्ड 1, पिंपळगाव 1, चोप 2, सीआरपीएफ 5, गांधी वार्ड 1, कन्नमवार वार्ड 1, कोंढाळा 1, कुरुड 1 व माता वार्ड 1 यांचा समावेश आहे.

आज 100 जण कोरोनामुक्त : यामध्ये गडचिरोलीमधील 28, अहेरी 11, आरमोरी 12, चामोर्शी 10, धानोरा 4, मुलचेरा 2, सिरोंचा 7, कोरची 3, कुरखेडा 8, वडसा 11, एटापल्ली 4, असे एकूण 100 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here